पोलादपूर: रायगड तापला; उष्णतेच्या लाटेने जनजीवन होरपळले
एप्रिलच्या अखेरीस उन्हाळ्याने अक्षरशः हैराण केले असून रायगड जिल्हा तापाच्या विळख्यात सापडला आहे. “सूर्यदेव कोपला” ही उपमा आता केवळ म्हण राहिलेली नसून प्रत्यक्षात नागरिकांच्या अंगावर येणारा अनुभव ठरत आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढत असून, उष्णतेच्या झळांनी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, महाड, माणगाव या भागांत तापमान ३७ ते ३९ अंशांच्या घरात पोहोचले आहे.