पेण: खारपाडा नाक्यावर स्थानिकांकडूनही टोलवसुली
Pen, Raigad | May 23, 2026 मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा टोलनाका सुरू झाल्यानंतर, रायगड जिल्ह्यातील एमएच-०६ आणि एमएच-४६ पासिंगच्या वाहनांना टोलमाफी दिल्याबाबत मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात टोलनाक्यावर या वाहनांकडून सर्रास टोल वसूल केला जात आहे. त्यामुळे रायगडकरांची दिशाभूल झाल्याचा आरोप होत आहे. याबाबत सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही मौन बाळगल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.