नाशिक: नाशिकरोड भागातील गंगापाडळी येथे शेतातील चाळीच्या लोखंडी पाईपला गळफास घेऊन एकाने केली आत्महत्या, पोलिसांत नोंद
Nashik, Nashik | Jul 5, 2025 नाशिकरोड भागातील गंगापाडळी येथे शेतातील चाळीच्या लोखंडी पाईपाला गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली असून नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयराम बापू वलवे वय 50 राहणार गंगापाडळी यांनी शेतातील चाळीत लोखंडी पाईपला साडीच्या साह्याने गळफास घेतला. आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नसून पोलीस हवालदार पवार पुढील तपास करीत आहे.