जाफराबाद: बरंजळा साबळे येथे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी दिली सांत्वन पर भेट
आज दिनांक 6 मे 2026 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी मयत शेतकऱ्याच्या घरी सांतन पर भेट दिली आहे, याप्रसंगी त्यांनी 4 दिवसापूर्वी दुःखद निधन झालेले कैलासवासी समाधान सर्जेराव कोरके व अनिल संतोष बोर्डे यांच्या घरी ही भेट देत या परिवाराचे सांत्वन केले आहे याप्रसंगी गावकरी व परिवाराचे सदस्य पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.