भीमपुरा परिसरातून डॉक्टर महिलेचे मंगळसूत्र पळविले, अज्ञात आरोपीं विरुद्ध उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Mar 3, 2026
आज मंगळवार तीन मार्च रोजी उस्मानपुरा पोलिसांनी माध्यमांना माहिती दिली की, दोन मार्चला रात्री नऊ वाजता महिला फिर्यादी डॉक्टर अर्चना अनिल गायकवाड राहणार उस्मानपुरा छत्रपती संभाजी नगर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की एक मार्चला रात्री नऊ वाजता दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी त्यांच्या गळ्यातील 90 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने चोरी करून नेले आहे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक फौजदार जगताप पुढील तपास करीत आहे.