अमरावती: घरफोडीच्या गुन्ह्यातील कुख्यात आरोपीला चाळीसगावातून अटक; गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई
घरफोडी करणा-या एका कुख्यात आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जळगावातील चाळीसगाव येथून अटक केली. शेख मुखतार शेख मेहबुब उर्फे दाडया (रा. नुरानी नगर, पाचोरा, जि. जळगाव) असे आरोपीचे नाव असून, त्याच्या ताब्यातून मुद्देमाल जप्तीचे प्रयत्न पोलिस करीत आहे.या आरोपीने अमरावती शहरासह संभाजीनगर, जळगाव व महाराष्ट्रामधील इतर जिल्ह्यातही घरफोड्या केल्या आहेत. अशी माहिती 12 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता प्राप्त झाली.