सावनेर: शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्या बद्दल आमदार डॉ आशिष देशमुख यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
Savner, Nagpur | Jul 24, 2026 देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे कार्य केले आहे. पीएम-किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्यात आली आहे.तसेच महाराष्ट्रात ₹36,000 कोटींच्या शेतकरी कर्जमाफीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, त्याचा लाभ सुमारे 50 लाख शेतकऱ्यांना होणार आहे.