श्रीवर्धन: दिघी-पुणे मार्ग प्रशासनाच्या समन्वयाअभावी रखडला
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला नवे पंख देणारा दिघी-पुणे पर्यायी मार्ग सध्या केवळ 'समन्वया अभावी अडलेला स्वप्नमार्ग' ठरला आहे. श्रीवर्धन जवळील दिघी बंदर ते पुणे या अंतराला गती देणारा, वेळ व खर्चाची मोठी बचत करणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केवळ 6 ते 7 किमी अपूर्ण रस्त्यामुळे रखडल्याचे वास्तव समोर आले आहे.