पोलादपूर: रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईचे चटके तीव्र
उन्हाचा कडाका वाढू लागल्याने रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या आता गंभीर रूप धारण करत आहे. रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 4 मे पर्यंत जिल्ह्यातील एकूण 42 गावे आणि 184 वाड्या, अशा एकूण 226 ठिकाणांना 50 खासगी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या टंचाईचा फटका जिल्ह्यातील तब्बल 80 हजार 091 लोकसंख्येला बसत आहे.