निफाड: पिंपळगाव बसवंत शहरात समर्थनगरमध्ये घरपोडी पिंपळगाव पोलिसांची माहिती
Niphad, Nashik | Jul 5, 2025 निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शहरातील समर्थ नगर येथे बापूसाहेब अपार्टमेंटमध्ये दि. 3 च्या मध्यरात्री व दि ४ च्या सकाळी साडेसहा वाजेपर्यंत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत कपाटातील चोरकप्प्यात ठेवलेले आठ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी आज दि. ५ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता दिली.