गर्भाशय मुख कर्करोगाला हरवण्यासाठी 'एचपीव्ही' लस हेच प्रभावी शस्त्र; पालकमंत्री इंद्रनील नाईक यांचे गोंदियावासीयांना आवाहन
3.9k views | Gondia, Maharashtra | Apr 24, 2026 गर्भाशय मुख कर्करोगाला हरवण्यासाठी 'एचपीव्ही' लस हेच प्रभावी शस्त्र; पालकमंत्री इंद्रनील नाईक यांचे गोंदियावासीयांना आवाहन गोंदिया: महिलांमधील कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, त्यात 'गर्भाशय मुखाचा कर्करोग' (Cervical Cancer) हे मृत्यूचे एक प्रमुख कारण ठरत आहे. मात्र, वेळीच लसीकरण केल्यास या जीवघेण्या आजाराला पूर्णपणे रोखणे शक्य आहे. याच पार्श्वभूमीवर, गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. इंद्रनील नाईक आणि आमदार श्री. राजकुमार बडोले यांनी जिल्हावासीयांना आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी एच.पी.व्ही. (HPV) लसीकरण करून घेण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.