हिंगणा: कवडस येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आमदार समीर मेघे यांची उपस्थिती
Hingna, Nagpur | Apr 11, 2026 हिंगणा मतदारसंघातील कवडस येथे "अखंड हरिनाम सप्ताह" निमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार समीर मेघे यांनी उपस्थित राहून पोथीचे पूजन केले. तसेच भागवताचार्य ह. भ. प. श्री. रोशन महाराज कळंबे यांचे स्वागत केले. या प्रसंगी कार्यक्रमात सरपंच सौ. उषाताई सावळे व उपसरपंच श्रीकांत गावंडे यांनी व आयोजन समितीने प्रेमाने केलेल्या स्वागतबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच उपस्थित सर्व गावकरी बंधू-भगिनींना कार्यक्रमाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.