कल्याण मोहन्यातील गोळीबार प्रकरणाचा धक्कादायक उलगडा!
विरोधकाचा WhatsApp स्टेटस ठेवल्याच्या रागातून गोळीबार, स्वतःवर गोळी झाडून रचला खोटा कट
अभिषेक उर्फ अभि पवारसह तिघांविरोधात गुन्हा दाखल; तिघांना अटक, मुख्य आरोपी उपचाराधीन
कल्याण : कल्याण जवळील मोहने पाटील नगर परिसरात काल रात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेचा खडकपाडा पोलिसांनी अवघ्या काही तासांत उलगडा केला . पोलीस तपासा दरम्यान या प्रकरणात धक्कादायक सत्य समोर आले आहे. सुरुवातीला स्वतःवर हल्ला झाल्याचा बनाव रचणाऱ्या अभिषेक उर्फ अभि पवारनेच संपूर्ण कट आखल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
WhatsApp वर विरोधकाचा स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी अभिषेक पवार आणि मोनू फुलोरे यांच्यात वाद झाला होता. या वादाचे पर्यवसान मारहाणीपर्यंत झाले होते. काल अभिषेक पवार आणि त्याचे दहा ते बारा साथीदार एका हळदीच्या कार्यक्रमातून रात्रीच्या सुमारास मोहन परिसरात आले. मोहन पाटील नग�
Kalyan, Thane | Jun 6, 2026