सावनेर: सावनेर तालुक्यात उष्माघाताचा चौथा बळी! वाढत्या उष्णतेचा कहर
Savner, Nagpur | May 25, 2026 सावनेर शहरात उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून उष्माघातामुळे एका नागरिकांना आपले प्राण गमवावे लागल्याची अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी घटना समोर आली आहे 24 मे रविवारला दुपारी दोन वाजताच्या सुमारास बिकानेर हॉटेल जवळ एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडून असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोडे यांना विनोद बोबडे यांच्याकडून मिळाली घटनेचे गांभीर ओळखून हितेश बनसोड यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांच्याशी संपर्क साधला