दिल्लीत पार पडलेल्या 'पी-२०' परिषदेदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनावरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. याचे पडसाद नागपुरात पडले असून आज तीव्र आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचा निषेध करताना भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका करण्यात आली असून, काँग्रेस म्हणजे 'अर्बन नक्षलवादाचे' प्रतीक असल्याची घणाघाती टीका करण्यात आली आहे.