अमरावती: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर शहरात सराफ परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी केली फटाक्यांची आतिषबाजी
महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यावर गुरुवारी 5 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शहरातील सराफ परिसरात भाजप समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला.यावेळी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ नारेबाजीही करण्यात आली.कार्यकर्त्यांमध्ये यावेळी मोठा उत्साह दिसून आला.