जुन्या वादातून 17 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; आरोपींना अटक बोनट वर बांधून आरोपींची धिंड
कात्रज परिसरात जुन्या वादातून १७ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२० जुलै) रात्री घडली. मोबाईल दुरुस्त करून घेण्यासाठी मित्रासह गेलेल्या गणेश रविंद्र माळवे (वय १७, रा. कात्रज गाव) याच्यावर भररस्त्यात कोयते आणि लोखंडी शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या गणेशला भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे कात्रज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. चार आरोपींना अटक केल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर आरोपींना पोलीस वाहनाला बांधून त्यांची धिंड काढण्यात आली.
#crimeupdate #policeaction #katrajmurder #punepolice #murdercase
Haveli, Pune | Jul 21, 2026