कर्जत: नेरळ पाडा मिनीट्रेन मार्गावरील फाटक-रस्ता बंद
Karjat, Raigad | Apr 20, 2026 नेरळ गावातून जाणाऱ्या नेरळ माथेरान मिनी ट्रेन मार्गावरील नेरळ पाडा येथील फाटक गेली चार दिवस दुरुस्तीच्या कामासाठी बंद आहे. हे फाटक दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येत असताना कोणत्याही प्रकारची नोटीस अथवा सूचना वाहनचालक यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे वाहनचालक यांच्यात संतापाची भावना असून म ध्य रेल्वे विभागाच्या या निर्णयाविरुद्ध मुंबई येथील विभागीय व्यवस्थापक यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत.