हरवलेल्या वृद्ध महिलेचा मृतदेह लाखलगाव येथील खडीक्रेशर येथे आढळून आल्याची घटना 29 नोव्हेंबर रोजी उघडकीस चालू असून रात्री नऊ वाजता आडगाव पोलीस ठाणे ताकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी 30 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजूबाई सिंधू केंगे वय 70 राहणार ओढा रेल्वे, हमालवाडी या घरात कोणाला काही न सांगता कुठेतरी निघून गेल्या होत्या. त्यांचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाही. लाखलगाव येथील एका खडीक्रेशर मध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.