समुद्रपूर: सेवा येथे १७ वर्षीय मुलाची घरा शेजारी असलेल्या सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या:पोलिसात आकस्मिक मृत्युची नोंद
सेवा येथे पियुष विठ्ठल बावणे या १७ वर्षीय मुलाने रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घरा शेजारी असलेल्या सरकारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आज १५ एप्रिलला सोमवारी पोलिसांकडून प्राप्त झाली असून यासंबंधी समुद्रपुर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भिमरावजी बावणे राहणार सेवा यांचे घरी कंदुरिचा कार्यक्रम होता मृतक पियुष याला जेवण वाढायला सांगितले असता त्याला राग आला व त्याने विहीर उडी घेऊन आत्महत्या केली.