धुळे: बँक अधिकाऱ्यावर हल्ला: एसबीआय देवपूर शाखेतील कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन करून कारवाईची केली मागणी
Dhule, Dhule | Jun 10, 2025 धुळे शहरातील देवपूर प्रमोद नगर येथील एसबीआय बँकेमध्ये ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणी विरोधात बँक कर्मचारी आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले आहे, ठाकरे गट शिवसेनेच्या मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना कठोरात कठोर शासन करण्यात यावे या मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांनी आज काळ्याफिती लावून या प्रकाराचा निषेध केला आहे. त्यांनी देवपूर परिसरात काम बंद आंदोलन करून धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहेत.