धुळे: साक्रीरोड परिसरातील साथीच्या रोगांवर आयुक्त अमिता दगडे पाटील यांची पाहणी
Dhule, Dhule | Jun 9, 2025 धुळे शहरातील साक्रीरोड परिसरात साथीच्या रोगांच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त तथा प्रशासक श्रीमती अमिता दगडे पाटील यांनी यशवंतनगर, भिमनगर, कुमारनगर, शनिनगर व हनुमान टेकडी परिसराची समक्ष पाहणी केली. अतिसार रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महानगरपालिकेच्या वतीने पाणी नमुने तपासणी, आरोग्य शिबिरे, गृहभेटी अशा विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना युध्दपातळीवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले.