डोंबिवली आजदे पाडा सागर्ली परिसरात उघडे विद्युत बॉक्स ठरतायत धोकादायक
भाजप नगरसेविकेच्या तक्रारीकडे महावितरण अधिकऱयांचे दुर्लक्ष
डोंबिवली पूर्वेतील आजदेपाडा परिसरातील
सागरली भागात विद्युत पुरवठा करणारे अनेक इलेक्ट्रिक बॉक्स उघडे असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या उघड्या विद्युत बॉक्समुळे नागरिकांना विजेचा धक्का बसण्याचा धोका वाढला असून परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या गंभीर समस्येबाबत स्थानिक नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांनी संबंधित वीज विभागाच्या अधिकाऱ्यांशी वारंवार दूरध्वनीवर संपर्क साधून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
नागरिकांच्या जीविताशी संबंधित अशा गंभीर बाबीकडे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन उघडे व�
Kalyan, Thane | Jul 16, 2026