नागपूर शहर: कोंबडा बाजार बंद केल्याने रोष; आयुक्तांना निवेदन सादर
लकडगंज झोनमधील १०० वर्षांची परंपरा असलेला ऐतिहासिक कोंबडा बाजार अचानक बंद केल्यामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या कारवाईच्या निषेधार्थ नगरसेवक वसीम खान, सिराज अहमद आणि नगरसेविका सय्यद मुस्कान यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका आयुक्तांना मागणी पत्र सोपवण्यात आले.कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई केल्यामुळे शेकडो गरीब कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.