श्रीवर्धन: पावसाबरोबरच रोह्याच्या बाजारात रानभाज्या दाखल
दडी मारुन बसलेला पाऊस जसा सक्रिय झाला तसे रोह्याच्या बाजारात आता रानभाज्या दाखल होऊ लागलेल्या आहेत. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी बदलत्या हवामानानुसार बारमाही नजीकच्या बाजारपेठेत तसेच रहदारीच्या मार्गावर विविध विविध प्रकारच्या वस्तूंची व भाज्यांची विक्री त्यांना आर्थिक बळ देणाऱ्या ठरतात रानभाज्या या रानभाज्या विक्रीमुळे आदिवासी कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. उन्हाळ्यात आंबे, काजू, फणस, करवंद, जांभळांसह विविध प्रकारचे रान मेवा म्हणून त्याची देखील मोठ्या प्रमाणात विक्री या आदिवासी महिलाकडून होत असते.