जाफराबाद: टेंभुर्णी जाफराबाद मुख्य मार्गावर अपघात आळा बसवण्यासाठी बांधकाम विभागाकडून खबरदारी,टेंभुर्णी येथे बसवण्यात आले गतिरोधक
आज दिनांक 28 एप्रिल 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी ते जाफराबाद या मुख्य मार्गावर अपघाताला आळा बसवण्यासाठी भोकरदन जाफराबाद या बांधकाम विभागाकडून टेंभुर्णी गावात मुख्य मार्गावर गतिरोधक बसवण्यात आले आहे,कारण मागील काही दिवसापासून रस्ता सुसाट झाल्यामुळे वाहनधारक सुसाट वाहन चालवत आहे,यामुळे अपघात होत आहे, कित्येकांना आपला जीव गमावा लागला आहे,त्यामुळे या घटनांना आळा घालण्यासाठी गतिरोधक बसवण्यात आले आहे.