इंदापूर, ता. १२ : वनगळी (ता. इंदापूर) येथे पंचनामा सुरू असताना मद्यधुंद अवस्थेतील शेजाऱ्याने घरात घुसून महिला, तिचा पती आणि मुलाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.11) सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. एवढेच नव्हे तर महिलेच्या गळ्यातील अर्धा तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
सोमनाथ नामदेव चव्हाण असे गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. या प्रकरणी अर्चना अतुल सोनकांबळे (वय ३६, रा. वनगळी, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना सोनकांबळे या मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बावधन पोलीस ठाण्यातील महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल गिरी आणि त्यांचे पथक अर्चना सोनकांबळे यांच्या अल्पवयीन मुलीसोबत पंचनामा करण्यासाठी त्यांच्या घरी आले होते. त्यावेळी शेजारी राहणारा सोमनाथ नामदेव चव्हाण हा मद्यधुंद अवस्थेत तेथे आला आणि "मुलगी काय जबाब देते ते मला पाहायचे आहे" असे सांगत तेथून जाण्यास नकार दिला.
पोलिसांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितल्यानंतर तो अंगणात जाऊन शिवीगाळ करू लागला. अर्चना सोनकांबळे आणि त्यांचा मुलगा आर्यन यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता, सोमनाथ चव्हाण याने अर्चना यांच्या कानशिलात लगावून दगडाने त्यांच्या खांद्यावर आणि पाठीवर मारहाण केली. आईला वाचवण्यासाठी आलेल्या आर्यनलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
.
.
.
#Indapur #PuneCrime #AssaultOnFamily #PuneRuralPolice #BreakingNewsMaharashtra #CrimeAlertPune
Haveli, Pune | Jun 12, 2026