लांजा येथील काजू फॅक्टरीतील चोरी रत्नागिरी पोलीस दलाकडून उघड.
लांजा येथील एका काजू फॅक्टरीमध्ये अज्ञात चोरट्यांनी फॅक्टरी फोडून काजूगर चोरी केल्याची घटना घडली होती. सदर गुन्ह्याचा तपास रत्नागिरी पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्यात येत होता. गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने 02 इसमांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनासह एकूण रु. 9,41,879/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे व त्यांच्या पथकाकडून करण्यात आली आहे.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #ratnagiri #RatnagiriPolice