डोंबिवली पूर्व पश्चिम स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी विरोधात शिवसेना माजी नगरसेवक शैलेश धात्रक आक्रमक
स्टेशन परिसरातील बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करा टोविंग व्हॅन सेवा पुन्हा सुरू करा
पंधरा दिवसात वाहतूक कोंडीवर ठोस उपाय योजना न केल्यास आंदोलन .. माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांचा वाहतूक पोलीस प्रशासनाला इशारा
डोंबिवली :- डोंबिवली पूर्व ,पश्चिम स्टेशन परिसरात नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते . स्टेशन परिसरात बेशिस्त वाहन चालक मोठ्या प्रमाणात बेशिस्तपणे गाड्या पार्क करत असल्याने या वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणात भर पडते . त्यामुळे स्टेशन परिसरात वाहन चालकांची मात्र चांगलीच दमछाक होते .वाहतूक पोलिसांचे टोविंग व्हॅन सेवा बंद असल्याने अशा वाहनांवर कारवाई करता येत नाही याबाबत शिवसेनेचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी वाहतूक विभागाला पत्र पाठवले आहे . स्टेशन परिसर
Kalyan, Thane | Jul 16, 2026