पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, श्री. चंद्र किशोर मीना (भा.पो.से.) यांच्या शुभहस्ते रत्नागिरी पोलीस दलाच्या 'मिशन RAPID' या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या संकल्पनेतून व दूरदृष्टीतून विकसित करण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे 'रत्नसेतू' चॅटबॉटच्या माध्यमातून नागरिकांना विविध ऑनलाइन पोलीस सेवा सुलभ, जलद व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी 'रत्नसेतू' चॅटबॉट (९३७१४१५६१२) चा अधिकाधिक वापर करून उपलब्ध ऑनलाइन पोलीस सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलातर्फे करण्यात आले.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #missionrapid #ratnagiripolice