सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती तसेच वाहतूक नियम व रस्ता सुरक्षेबाबत नागरिक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे विशेष जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
📅 दिनांक: १४ ऑगस्ट २०२६
⏰ वेळ: सकाळी ९.०० ते दुपारी १२.००
📍 स्थळ: जिल्हा नियोजन समिती हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर
जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.