मालेवाडा येथे माओवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना विनम्र अभिवादन!
दि. 06 जून 2005 रोजी मालेवाडा येथे कर्तव्य बजावत असताना मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांच्या शौर्याला आणि सर्वोच्च बलिदानाला गडचिरोली पोलीस दलाचा सन्मानपूर्वक सलाम.
शहीद चंद्रशेखर वाघाडे, शहीद धनश्याम टेकाम आणि शहीद चुन्नीलाल जांभूळकर यांचे राष्ट्रासाठीचे बलिदान सदैव प्रेरणादायी राहील.
त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन आणि कुटुंबीयांप्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो.
“शौर्य, कर्तव्य आणि बलिदान यांची ही गाथा सदैव स्मरणात राहील.”
#गडचिरोलीपोलीस #MalewadaAttack #ShaheedJawan #VeerJawan #SaluteToMartyrs