हिंसाचारातून विकासाच्या मार्गाकडे… आत्मसमर्पित बांधवांच्या पुनर्वसनासाठी शासन आणि गडचिरोली पोलीस दलाचे सातत्यपूर्ण प्रयत्न.
मुख्य सचिव महाराष्ट्र शासन मा. श्री. राजेश अग्रवाल आणि पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मा. श्री. सदानंद दाते यांनी नवजीवन वसाहत, नवेगाव येथे आत्मसमर्पित माओवादी सदस्यांशी संवाद साधत त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचवला.
यावेळी पुनर्वसन निधी धनादेश, शिलाई मशीन, स्प्रे पंप, विविध शासकीय कार्डे, वाहन चालक परवाने तसेच उपजीविकेसाठी आवश्यक साहित्यांचे वितरण करण्यात आले.
मुख्य प्रवाहात सहभागी होत आत्मनिर्भर आणि सन्मानाचे जीवन जगण्यासाठी शासन व गडचिरोली पोलीस दल कटिबद्ध आहे.
#GadchiroliPolice #NaxalFreeGadchiroli #Rehabilitation #NewLife #MainstreamDevelopment
@cmomaharashtra_ @dgpmaharashtra @mramesh_ips
Gadchiroli, Maharashtra | Jun 7, 2026