कल्याण-डोंबिवलीतील 3.25 लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; 220 केव्ही पडघा-पाल वीजवाहिनी ट्रिप
कल्याण-डोंबिवली परिसराला वीजपुरवठा करणारी 220 केव्ही पडघा–पाल वीजवाहिनी आज सायंकाळी 7:40 वाजता ट्रिप झाल्याने शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा अचानक खंडित झाला. या बिघाडामुळे सुमारे 3.25 लाख ग्राहक अंधारात गेले.या तांत्रिक बिघाडामुळे 22 केव्ही सोनारपाडा, कासा रिओ, कासा बेला, नेतीवली (अंशतः), एपिक, डाउनटाऊन, लेकशोर, उसाटणे आणि लोढा प्रीमियर या उपकेंद्रांवरील वीजपुरवठा बंद झाला.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक बिघाड दूर करण्याचे काम तातडीने हाती घेतले असून, वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती कार्यकारी अभियंता, कल्याण पूर्व यांनी दिली.
Kalyan, Thane | Jul 17, 2026