अंमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई; ₹1.46 कोटींचा मुद्देमाल जप्त!
गट्टा (फु.) परिसरात नाकाबंदीदरम्यान गडचिरोली पोलिसांनी अंमली पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या 08 आरोपींना ताब्यात घेतले.
स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस मदत केंद्र गट्टा (फु.) यांच्या संयुक्त कारवाईत आरोपींकडून 240.580 किलो अंमली पदार्थ, 03 चारचाकी वाहने आणि 08 मोबाईलसह एकूण ₹1 कोटी 46 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त अंमली पदार्थांची अंदाजे किंमत ₹1.20 कोटींहून अधिक आहे.
आठही आरोपींविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना 03 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
अंमली पदार्थांना आळा… सुरक्षित समाजासाठी कठोर कारवाई!
गडचिरोली पोलीस — सदैव सतर्क, सदैव तत्पर.
#GadchiroliPolice #AntiNarcotics #DrugFreeSociety #NDPS #PoliceAction CrimePrevention Gadchiroli MaharashtraPolice