Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka
Education
Rss
Firozabad

शालेय अन्नसुरक्षा व सकस आहार जनजागृती कार्यशाळा संपन्न कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, शिक्षण विभाग आणि अन्न व औषध प्रशासन, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय अन्नसुरक्षा व सकस आहार विषयक जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा कल्याण (पश्चिम) येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात पार पडली. कार्यशाळेत Food Safety and Standards (Safe Food and Balanced Diets for Children in School) Regulations, 2020 या नियमावलीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM POSHAN) योजनेची प्रभावी अंमलबजावणी, विद्यार्थ्यांना सकस व संतुलित आहार उपलब्ध करून देणे, स्वच्छता आणि आरोग्यदायी आहाराच्या सवयी विकसित करण्यावर भर देण्यात आला. यावेळी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शाळांमधील सुरक्षित अन्न व्यवस्थापन, स्वच्छ स्वयंपाकगृह, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, अन्न साठवणूक तसेच High Fat, Sugar and Salt (HFSS) युक्त खाद्यपदार्थांच्या विक्री व जाहिरातीवरील निर्बंध याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला महानगरपालिका कार्यक्षेत्रातील २७५ शाळांचे मुख्याध्यापक, समूह साधन केंद्रप्रमुख, केंद्रीय स्वयंपाकगृह प्रतिनिधी, महिला बचत गटांचे प्रतिनिधी तसेच मध्यान्ह भोजनाशी संबंधित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ, पोषणमूल्ययुक्त आणि संतुलित आहार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे तसेच अन्नसुरक्षेबाबत जनजागृती वाढविण्याचे आवाहन करण्यात आले.

Kalyan, Thane | Jul 16, 2026

MORE NEWS

शालेय अन्नसुरक्षा व सकस आहार जनजागृती कार्यशाळा संपन्न कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, शिक्षण विभाग आणि अन्न व औषध प्रशासन, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय अन्नसुरक्षा व सकस आहार विषयक जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा कल्याण (पश्चिम) येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात पार पडली. कार्यशाळेत Food Safety and Standards (Safe Food and Balanced Diets for Children in School) Regulations, 2020 या नियमावलीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM POSHAN) योजनेची प्रभावी अंमलबजावणी, विद्यार्थ्यांना सकस व संतुलित आहार उपलब्ध करून देणे, स्वच्छता आणि आरोग्यदायी आहाराच्या सवयी विकसित करण्यावर भर देण्यात आला. यावेळी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शाळांमधील सुरक्षित अन्न व्यवस्थापन, स्वच्छ स्वयंपाकगृह, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, अन्न साठवणूक तसेच High Fat, Sugar and Salt (HFSS) युक्त खाद्यपदार्थांच्या विक्री व जाहिरातीवरील निर्बंध याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला महानगरपालिका कार्यक्षेत्रातील २७५ शाळांचे मुख्याध्यापक, समूह साधन केंद्रप्रमुख, केंद्रीय स्वयंपाकगृह प्रतिनिधी, महिला बचत गटांचे प्रतिनिधी तसेच मध्यान्ह भोजनाशी संबंधित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ, पोषणमूल्ययुक्त आणि संतुलित आहार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे तसेच अन्नसुरक्षेबाबत जनजागृती वाढविण्याचे आवाहन करण्यात आले. - Kalyan News