
दिल्लीच्या गालिब इन्स्टिट्यूटमध्ये कल्याणचे एजाज शेख यांचा गौरव; ‘नॅशनल लँग्वेज अवॉर्ड’ने सन्मानित!
हिंदी दिनानिमित्त देशभरातील 25 मान्यवरांचा सन्मान; महाराष्ट्रातील केवळ 3 मान्यवरांची पुरस्कारासाठी निवड
दिल्ली : हिंदी दिनानिमित्त दिल्लीतील गालिब इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात एजाज अहमद शेख यांना प्रतिष्ठेच्या नॅशनल लँग्वेज अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. उर्दू भाषा क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
देशभरातून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 25 मान्यवरांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून केवळ 3 व्यक्तींची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली असून, त्यामध्ये एजाज अहमद शेख यांचा समावेश आहे.
दिल्लीतील गालिब इन्स्टिट्यूटमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आला.एजाज शेख हे कल्याण मध्ये वास्तव्यास असून ते मुंबई साकी नाका येथील ग्लोबल ज्युनिअर कॉलेज मध्ये उर्दू आणि भूगोल विषयाचे शिक्षक आहेत .गेल्या 15 वर्षापासून ते या कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. हे काम करत असताना इन्कलाब उर्दू वृत्तपत्रामध्ये पत्रकार म्हणून देखील कार्यरत आहेत .
Kalyan, Thane | Sep 15, 2026