
ट्रोलर्स सावधान..! फेसबुक-इन्स्टाग्रामवरील अश्लील कमेंट्स आता महागात पडणार; सरकार आणणार कठोर कायदा...
.
.
मुंबई: सोशल मीडिया हे केवळ मत मांडण्याचे साधन राहिले नसून तिथे वाढलेली अश्लील भाषा, वैयक्तिक चिखलफेक आणि ट्रोलिंगचे प्रमाण आता धोक्याच्या पातळीवर पोहोचले आहे. याच गंभीर मुद्द्यावर महाराष्ट्राच्या विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. सोशल मीडियावरील या बेलगाम प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी राज्य सरकार आता एक नवा आणि अत्यंत कडक कायदा आणण्याच्या तयारीत आहे.अनेकदा लोक बनावट (Fake) अकाउंट्स तयार करून किंवा स्वतःची ओळख लपवून इतरांवर चिखलफेक करतात, अश्लील कमेंट्स करतात. नवीन कायद्यामुळे अशा विकृत ट्रोलर्सचा शोध घेणे सोपे होणार असून, त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासारख्या कडक तरतुदी असण्याची शक्यता आहे. या नव्या कायद्यामुळे सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि अश्लील कमेंट्सला मोठा चाप बसणार आहे.
.
.
अशाच राजकीय, कायदेशीर आणि राज्यातील सर्व ताज्या घडामोडींच्या थेट अपडेट्ससाठी आमच्या @Puneprimenews चॅनेलला Follow करा, Like करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. 👍
.
.
.
#SocialMediaLaw #MaharashtraPolitics #CyberSecurity #JayantPatil #YogeshKadam #BreakingNews #Trolling #CyberCrime #MaharashtraGovernment #PunePrimeNews #vidhansabha2026
Haveli, Pune | Jul 2, 2026