केडीएमसीचा जनता दरबार ७ जूनचा कार्यक्रम रद्द
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयात ७ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात येणारा जनता दरबार कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
महापालिकेच्या कामकाजात येणाऱ्या अडीअडचणी, नागरिकांच्या तक्रारी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत आयुक्तांच्या दालनात जनता दरबाराचे आयोजन करण्यात येते. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव ७ जून रोजी होणारा जनता दरबार रद्द करण्यात आल्याचे परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
जनता दरबाराच्या पुढील तारखेची माहिती स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही महापालिकेने म्हटले आहे.
अतिरिक्त आयुक्त-२ हर्षल गायकवाड यांनी आयुक्तांच्या निर्देशानुसार हे परिपत्रक जारी केले आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Kalyan, Thane | Jun 6, 2026