Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Haryana
Uttarpradesh
Cricket

दोन वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा कुख्यात बिल्डर सलमान डोलारे अखेर जेरबंद; झोन-३ पोलीस आणि क्राइम ब्रँचची संयुक्त कारवाई कल्याण : गेल्या दोन वर्षांपासून पोलीस आणि क्राइम ब्रँचच्या शोधात असलेला कुख्यात बिल्डर सलमान डोलारे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. झोन-३ पोलीस आणि क्राइम ब्रँचच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. आरक्षित भूखंडांवर बेकायदा बांधकाम करून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी सलमान डोलारे याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस तपासादरम्यान डोलारे हा कल्याणमधील दूधनाका परिसरातील खोटाल मंजिल इमारतीच्या चौथ्या मजल्यावर लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे क्राइम ब्रँच आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. सलमान डोलारे याच्याविरुद्ध महात्मा फुले पोलीस ठाणे आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यात बारापेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. कल्याणमधील युसूफ हाइट्ससह आरक्षित भूखंडांवर खोट्या सह्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदा इमारती उभारल्याप्रकरणी देखील त्याच्याविरोधात गुन्हे नोंद आहेत.याशिवाय, इतर बेकायदा इमारती आणि बंगल्यांच्या बांधकामांशी संबंधित फसवणूक प्रकरणांमध्येही त्याचे नाव समोर आले आहे. जमीन व्यवहारांमध्ये नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हे दाखल असून तलाठ्याची बनावट सही, बनावट शिक्के आणि खोटे दस्तऐवज तयार केल्याचे गंभीर आरोपही त्याच्यावर आहेत.दरम्यान, सलमान डोलारेला ताब्यात घेतल्यानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी परिसरातील बंदोबस्त वाढविला असून पुढील तपास सुरू आहे.

Kalyan, Thane | Jun 6, 2026

MORE NEWS

Lकल्याण मधील खोटाल हाऊस या इमारतीत कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांचा छापा

फसवणुकीच्या 12 गुन्ह्यात फरार असलेला आरोपी सलमान डोलारे क्राइम ब्रांच पोलिसांनी घेतला ताब्यात

कुख्यात बिल्डर सलमान डोलारे घरात असल्याची पोलिसांना मिळाली होती माहिती

गेल्या दोन वर्षापासून ठाणे क्राइम ब्रांच, कल्याण क्राईम ब्रँच .,बाजारपेठ आणि महात्मा फुले पोलीस शोध घेत होती.

कल्याण मधील आरक्षित भूखंडांवर खोटे कागदपत्र तयार करून अनेक इमारती सलमान डोलारे यांनी बांधले आहेत

Lकल्याण मधील खोटाल हाऊस या इमारतीत कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांचा छापा फसवणुकीच्या 12 गुन्ह्यात फरार असलेला आरोपी सलमान डोलारे क्राइम ब्रांच पोलिसांनी घेतला ताब्यात कुख्यात बिल्डर सलमान डोलारे घरात असल्याची पोलिसांना मिळाली होती माहिती गेल्या दोन वर्षापासून ठाणे क्राइम ब्रांच, कल्याण क्राईम ब्रँच .,बाजारपेठ आणि महात्मा फुले पोलीस शोध घेत होती. कल्याण मधील आरक्षित भूखंडांवर खोटे कागदपत्र तयार करून अनेक इमारती सलमान डोलारे यांनी बांधले आहेत

Kalyan, Thane | Jun 6, 2026

घाटंजी: ATM फोडून चोरीचा प्रयत्न फसला; घाटंजी पोलिसांनी आरोपीला रंगेहात पकडले

घाटंजी: ATM फोडून चोरीचा प्रयत्न फसला; घाटंजी पोलिसांनी आरोपीला रंगेहात पकडले

Kalyan, Thane | Jun 6, 2026

टिटवाळा आंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड

कल्याण कसारा दरम्यान मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत

तिसरा आणि चौथ्या लाईनच्या कामादरम्यान सिग्नल वायर तुटल्याने  सिग्नल यंत्रणेत बिघाड

काही लोकल्स खोळंबल्याने प्रवाशांना नाहकत्रास

टिटवाळा आंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड कल्याण कसारा दरम्यान मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत तिसरा आणि चौथ्या लाईनच्या कामादरम्यान सिग्नल वायर तुटल्याने सिग्नल यंत्रणेत बिघाड काही लोकल्स खोळंबल्याने प्रवाशांना नाहकत्रास

Kalyan, Thane | Jun 6, 2026

दोन वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा कुख्यात बिल्डर सलमान डोलारे अखेर जेरबंद; झोन-३ पोलीस आणि क्राइम ब्रँचची संयुक्त कारवाई कल्याण : गेल्या दोन वर्षांपासून पोलीस आणि क्राइम ब्रँचच्या शोधात असलेला कुख्यात बिल्डर सलमान डोलारे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. झोन-३ पोलीस आणि क्राइम ब्रँचच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. आरक्षित भूखंडांवर बेकायदा बांधकाम करून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी सलमान डोलारे याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस तपासादरम्यान डोलारे हा कल्याणमधील दूधनाका परिसरातील खोटाल मंजिल इमारतीच्या चौथ्या मजल्यावर लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे क्राइम ब्रँच आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. सलमान डोलारे याच्याविरुद्ध महात्मा फुले पोलीस ठाणे आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यात बारापेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. कल्याणमधील युसूफ हाइट्ससह आरक्षित भूखंडांवर खोट्या सह्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदा इमारती उभारल्याप्रकरणी देखील त्याच्याविरोधात गुन्हे नोंद आहेत.याशिवाय, इतर बेकायदा इमारती आणि बंगल्यांच्या बांधकामांशी संबंधित फसवणूक प्रकरणांमध्येही त्याचे नाव समोर आले आहे. जमीन व्यवहारांमध्ये नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हे दाखल असून तलाठ्याची बनावट सही, बनावट शिक्के आणि खोटे दस्तऐवज तयार केल्याचे गंभीर आरोपही त्याच्यावर आहेत.दरम्यान, सलमान डोलारेला ताब्यात घेतल्यानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी परिसरातील बंदोबस्त वाढविला असून पुढील तपास सुरू आहे. - Kalyan News