उबाठा गटाचे कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख रियाज शमनजी यांचे निधन..
शिवसेनेच्या उबाठा गटाचे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख रियाज शमनजी यांचे आज सकाळी कोल्हापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही काळापासून रियाज शमनजी यांच्यावर कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समोर येताच सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.