KDMC सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे स्थायी समितीच्या सभेत अनुपस्थित ,स्थायी समिती सदस्य संतापले
सहाय्यक आयुक्त आयुक्तांपेक्षा मोठे आहेत का ?
सदस्यांचा थेट सवाल
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या सभेत ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त
सचिन तामखेडे यांच्या सातत्याने गैरहजेरीवरून मोठा वाद निर्माण झाला. "सर्व सहाय्यक आयुक्त सभेला उपस्थित राहतात, मग ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्तच वारंवार अनुपस्थित का राहतात? ते आयुक्तांपेक्षाही मोठे आहेत का?" असा संतप्त सवाल समिती सदस्यांनी उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले.
ई प्रभागाशी संबंधित विषय चर्चेला आल्यानंतर सहाय्यक आयुक्त तामखेडे सभागृहात नसल्याचे निदर्शनास येताच भाजपचे स्थायी समिती सदस्य दीपेश म्हात्रे आणि मंदार हळबे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "त्यांना तातडीने सभेत पाचारण करा. प्रत्येक बैठकीत त्यांच्याक
Kalyan, Thane | Jul 17, 2026