नागपूर ग्रामीण: झाडावरून चालत्या दुचाकीवर माकड उडाल्याने भीषण अपघात; ७३ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी
रस्त्याच्या कडेच्या झाडावरून अचानक चालत्या दुचाकीवर माकडझडप मारल्याने झालेल्या विचित्र अपघातात ७३ वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात आईच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर मुलगा किरकोळ जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास डव्हाखापरी ते पांदरी ठाणा मार्गावर घडली. : लीलाबाई कवदूजी तराळे असे मृतक महिलेचे नाव असून जगदीश तराळे हे गंभीर जखमी झाले आहे.