जळगाव लाईव्ह न्यूज । रक्षाबंधन म्हणजे प्रेम, विश्वास आणि आपुलकीचा अतूट धागा. याच नात्याला सामाजिक बांधिलकीची जोड देत पाळधी (ता.धरणगाव) येथे GPS मित्र व मैत्रीण परिवारातर्फे अंध, दिव्यांग व अनाथ भगिनींसोबत ‘अतूट धागा मायेचा’ हा अनोखा रक्षाबंधन सोहळा साजरा केला. या उपक्रमातून रक्षाबंधनाला माणुसकीचा नवा अर्थ मिळाला.
#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews