रामटेक: देवलापार नजीकच्या टुयापार येथे वाघाच्या हल्ल्यात म्हशीचा मृत्यू
Ramtek, Nagpur | Jul 15, 2026 बुधवार दिनांक 15 जुलैला सायंकाळी पाच ते साडेपाच वाजता च्या दरम्यान देवलापार वनपरिक्षेत्रातील टु्यापार या शेत शिवारात एका वाघाने हल्ला करून एका म्हशीच्या नरडीचा घोट घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील ग्रामवासी,शेतकरी, शेतमजूर, महिला पुरते भयभीत झाले आहेत.