रामटेक: न.प. रामटेक द्वारे रामटेक शहरात अतिक्रमण विरोधी धडक कारवाई; सहकार्य करण्याचे मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांचे आवाहन
Ramtek, Nagpur | May 14, 2026 न.प.रामटेक अंतर्गत विविध रस्ते,चौक, नाल्यावरील स्लॅब यावर अतिक्रमण केलेले दुकाने,पान,चाय टपरी, विविध प्रकारची दुकाने यावर नगरपरिषद रामटेक प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. गुरुवार दिनांक 14 मे या कारवाईचा दुसरा दिवस होता. नगर परिषद मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी आपल्या अतिक्रमण काढणाऱ्या पथकासह केलेल्या या कारवाई काही दुकाने जप्त करण्यात आली आहेत.