रामटेक: रामटेक येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न; 916 लाभार्थ्यांनी घेतला लाभ.
Ramtek, Nagpur | May 8, 2026 शुक्रवार दि. 8 मे रोजी सकाळी 11 ते सायं. 5 वाजेपर्यंत शांती मंगल कार्यालय रामटेक येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष बीकेंद्र महाजन तहसीलदार रमेश कोळपे, न.प. मुख्याधिकारी पल्लवी राऊत न. प. उपाध्यक्ष अलोक मानकर,आरोग्य सभापती सुमित कोठारी, बांधकाम सभापती विश्वास पाटील, नगरसेविका नलिनी चौधरी, कविता मुलमुले, सुरेखा माकडे अभिषेक डहारे उपस्थित होते