जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या घटनांचा छडा लावत एका सराईत आंतरराज्यीय आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल सहा चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे भुसावळ, जामनेर, अमळनेर आणि चोपडा परिसरातील मोटारसायकल चोरीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #bhusawal