जालना: मौजपुरी शिवारातील पिके पावसाअभावी धोक्यात; फळबागांवरही संकट; नुकसान भरपाईसह पिकविमा मंजूर करण्याची मागणी
Jalna, Jalna | Sep 6, 2026 जालना तालुक्यातील मौजपुरी शिवारात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतपिके धोक्यात आली आहेत. पावसाअभावी सोयाबीनसह इतर खरीप पिके पिवळी पडू लागली असून, अनेक शेतांतील पिकांनी माना टाकल्या आहेत. पिकांची वाढ खुंटल्याने शेतकर्यांच्या चिंतेत भर पडली आहे. रविवार दि. 6 सप्टेंबर 2024 रोजी दु. 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मौजपुरी परिसरात पावसाने उघडीप दिल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे पिकांना आवश्यक पाणी उपलब्ध होत नसल्याने त्याचा थेट परिणाम पिकांच्या वाढीवर होत आहे.