समुद्रपूर: गिरडमध्ये 114 वर्षांची अस्सल मातीची कुस्तीची दंगल; 51 पहिलवानांचा दमदार सहभाग
गिरड येथे दिवाळीनिमित्त श्रीराम मंदिर देवस्थान व हनुमान व्यायाम शाळेच्या वतीने आयोजित अस्सल मातीच्या कुस्तीच्या दंगलीत 51 पहिलवानांनी भाग घेतला. नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील गावांमधील पैलवानांनी दमदार कुस्ती करून रंगत आणली. परंपरेला 114 वर्षे पूर्ण झाली.